महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना बीड येथे समोर आलेली असून माजलगाव तालुक्यातील मंजरथ येथे काळे वस्तीवर राहणाऱ्या एका व्यक्तीने पत्नीच्या गळ्यावर कुर्हाडीने वार केलेले असून याच वेळी तिचा त्यांचा अल्पवयीन सहा वर्षाचा मुलगा जागा झाला अन त्यानंतर या नराधम बापाने त्याच्याही मानेवर खून करत त्याची देखील हत्या केलेली आहे. सोमवारी उशीरा ही घटना घडली असून या नराधम बापाला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात येत आहे.
उपलब्ध माहितीनुसार, पांडुरंग शिवाजी दोडतले असे आरोपीचे नाव असून पहाटे तीनच्या सुमारास त्याने त्याची पत्नी असलेली लक्ष्मी हिच्या गळ्यावर कुर्हाडीने वार केले त्यावेळी लक्ष्मी ओरडली म्हणून तिचा सहा वर्षाचा मुलगा जागा झाला त्यानंतर आरोपीने त्याच्या देखील गळ्यावर कुर्हाडीने वार करत त्याची देखील हत्या केली आणि त्यानंतर गळफास घेण्याचा प्रयत्न केला मात्र दोर तुटल्यामुळे तो बचावला.
सदर घटना घडताना मोठ्या प्रमाणात आरडाओरडा झाल्याने आजूबाजूचे लोक जागे झाले आणि तात्काळ पोलिसांना खबर दिल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले. ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात दुहेरी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.