अन ‘ ती ‘ दुपार ठरली शेवटची , सिध्दीने गमावला जीव

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना रत्नागिरी जिल्ह्यात समोर आलेली असून रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील घोणसरी येथे एक दुर्दैवी प्रकार समोर आलेला आहे. एका उंदराचा पाठलाग करत विषारी साप एका कुटुंबाच्या घरात घुसला आणि त्यानंतर बिछान्यावर झोपलेल्या मुलीला त्याने दंश केला. दुर्दैवाने या मुलीचा यात मृत्यू झालेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सिद्धी चव्हाण असे या दुर्दैवी मुलीचे नाव असून एका उंदराचा पाठलाग करत साप घरात शिरलेला होता त्यावेळी या सापाने सिद्धी चव्हाण हिला तीन वेळा दंश केला. गुरुवारी दुपारी ही घटना घडलेली असून परिसरातील नातलगांनी तिला तात्काळ दवाखान्यात नेले होते मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झालेला होता. सदर प्रकरणी सदर घटनेनंतर परिसरात शोकाकुल वातावरण असल्याचे समजते. जोरदार पावसामुळे सध्या उंदीर बाहेर पडत असून साप देखील बाहेर पडण्याचे प्रमाण वाढलेले असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.


Spread the love