राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पोलीस स्टेशनबाहेरच ठिय्या आंदोलन केलेले असून जळगाव येथील जिल्हा दूध संघात झालेल्या गैरव्यवहार बद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली होती. गेल्या तीस तासांपासून एकनाथ खडसे यांनी पोलीस स्टेशनसमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा देखील त्यांनी इशारा दिलेला आहे
एकनाथ खडसे यांनी जिल्हा दूध संघात झालेल्या गैरव्यवहाराबद्दल हा गैरव्यवहार नसून यामध्ये तब्बल दीड कोटी रुपयांची चोरी झालेली आहे असा आरोप केलेला आहे मात्र संबंधित व्यक्ती हे राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने पोलिसांकडून गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात आहे असा देखील त्यांनी आरोप केलेला आहे. गेले 16 तास आपण येथे ठिय्या आंदोलन करत असून अद्यापही पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. जोपर्यंत पोलिसांचे आपण कपडे उतरवणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असे देखील त्यांनी ठणकावले आहे.
जळगाव शहर पोलीस स्थानकाच्या बाहेर एकनाथ खडसे यांनी या आंदोलनाला सुरुवात केली असून पोलिसांकडून गुन्हा दाखल होत नाही यामागे राजकीय हस्तक्षेप आहे असे देखील असे देखील खडसे यांनी म्हटलेले आहे. शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी केवळ त्यांचे निवेदन स्वीकारले आहे मात्र गुन्हा दाखल केलेला नाही. पोलिस निरीक्षकांच्या दालनात पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी पोलीस प्रशासनाचा विरोध केलेला असून एकनाथ खडसे यांचे ठिय्या आंदोलन जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत सुरू राहणार आहे असे समजते .