‘ पाऊस किती पडावा हे महापालिका ठरवत नाही ‘ , पुण्यातील पुरावर भाजपचे हात वर

महाराष्ट्रात सध्या जोरदार पाऊस सुरू असून पुण्यात विक्रमी पाऊस झाल्यानंतर अनेक घरांमध्ये पाणी घुसले होते. मोठ्या प्रमाणात वाहने देखील पाण्यात वाहून गेली आणि दुकानात पाणी घुसून दुकानांचे देखील प्रचंड नुकसान झाले त्यामुळे महापालिकेत सत्ता असलेल्या भाजपवर जोरदार टीका होत असून मुंबईची तुंबाई झाल्यावरून शिवसेनेला घेरणाऱ्या भाजपने मात्र यावर प्रतिक्रिया देताना ‘ पाऊस किती पडावा हे महापालिका ठरवत नाही ‘ असे म्हटले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलेले आहे.

दिल्ली येथे पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘ पाऊस किती पडावा हे महापालिका ठरवत नाही पण जो पाऊस पडला त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साठलेले आहे. पुण्यात पडलेल्या पावसाने मागील दहा वर्षाचा विक्रम मोडला असून मागील 24 तासात पुण्यात सर्वाधिक पाऊस पडलेला आहे. शंभर वर्षांचा रेकॉर्डपेक्षा हे रेकॉर्ड थोडेसे कमी असून इतका मोठा पाऊस पडल्यानंतर पाणी तुंबलेले आहे.

ड्रेनेज डिझाईन करत असताना पावसाचा विचार केलेला नसतो. भाजपची सत्ता ही पाच वर्षांपूर्वीच आलेली आहे त्यामुळे हे ड्रेनेजचे डिझाईन आम्ही सत्तेत असताना करण्यात आलेले नाही तर चाळीस वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेले आहे आहे . सध्याची परिस्थिती पाहिली तर ड्रेनेज लवकर दुरुस्त झाले पाहिजेत यासाठी महापालिका प्रयत्न करेल आणि नवीन डिझाईन तयार करेल असे देखील ते म्हणाले.