गुन्हेगार कोणता गुन्हा कधी करेल याचा नेम राहिलेला नाही. अशीच एक धक्कादायक घटना रशियामध्ये उघडकीस आली असून दारूसोबत चक्क मानवी मांस खाणाऱ्या 32 वर्षाच्या व्लदीमिर याला तीन लोकांची हत्या केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे . व्लदीमिर हा केवळ लोकांची हत्याच करत नव्हता तर यानंतर त्यांचं कच्च मांस खात त्यासोबत वोडका पित असायचा, अशी देखील माहिती पुढे आली आहे .
उपलब्ध माहितीनुसार, व्लदीमिर याचे वय ३२ वर्षे असून २०२१ लाच त्याने मार्च महिन्यात एक महिला आणि तिच्या मैत्रिणीसोबत भांडण झाल्यानं दोघींची हत्या केली. कोर्टात या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान क्राईम ब्रांचच्या हेडनं सांगितलं की दोघींच्या हत्येनंतर त्याला मानवी मांस खाण्याची इच्छा झाली. अशात या दोघींचे दोन्ही मृतदेह घरातच ठेवले आणि दारू आणण्यासाठी गेला. ज्यांचे मांस त्याने खाल्ले ते नक्की कोण होते याचा अद्याप तपास लागलेला नाही.
जेव्हा पोलिसांना आधीच्या दोन आणि नंतरच्या या एका हत्येच्या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तपासाला सुरुवात केली. यात समोर आलं की व्लादिमीर हाच तिसऱ्या व्यक्तीचाही हत्यारा आहे. पोलीस चौकशीदरम्यान त्यानं आपला गुन्हा मान्य केला आहे. व्लादिमीरला आता जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.