पुण्यातील ‘ तो ‘ पोलीस कर्मचारी निलंबित , सहकारी महिलेसोबत गैरवर्तन

Spread the love

पोलीस म्हटल्यानंतर नागरिक पोलिसांकडून जबाबदारीच्या वर्तनाची अपेक्षा ठेवतात मात्र क्वचित काही प्रसंगी पोलिसांकडून देखील अक्षम्य चुका होतात असेच एक प्रकरण पुण्यात समोर आले असून विवाहित असताना तरुणीसोबत प्रेम संबंध ठेवणारा तसेच घटस्फोट झाला नसताना देखील एका महिला पोलिसाला लग्नाविषयी विचारणा करणाऱ्या पोलिस शिपायाला अखेर पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, हेमंत नथू रोकडे असे या पोलिस शिपायाचे नाव असून वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात त्याची नियुक्ती करण्यात आली होती. त्याच्याविरुद्ध 2 जानेवारी 2021 रोजी औरंगाबाद पोलीस दलातील कन्नड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. रोकडे हा विवाहित असून विवाहानंतर त्याने अनेक विवाहित अनेक तरुणीसोबत प्रेम संबंध ठेवून वर्दीला काळीमा फासला तसेच पोलीस मुख्यालयातील एका महिला शिपाईकडे त्याने लग्नासाठी विचारणा केली . त्याने पत्नीचा विश्‍वासघात केला आणि तिला लोणावळा येथे फिरायला गेल्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिली .

त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्याची विभागीय चौकशी करण्यात आली त्यावेळी तो चौकशीसाठी फक्त एकदा उपस्थित राहिला आणि इतर वेळी त्याने चौकशीला कुठलेही सहकार्य केले नाही. पोलीस दलाची प्रतिमा त्याच्या वर्तणुकीमुळे मलिन झाल्याचा ठपका ठेवत अतिरिक्त पोलिस आयुक्‍त राजेंद्र डहाळे यांनी त्याला निलंबित केले आहे.


Spread the love