सोशल मीडियावर सध्या एका वेगळ्याच प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून बायकोच्या विवाहबाह्य संबंधाला वैतागून एका हॉटेल मालकाने ट्रेनच्या समोर उडी घेऊन आत्महत्या केलेली आहे. राजस्थानातील भीलवाडा परिसरात ही घटना घडलेली असून ट्रेन समोर उडी घेण्याआधी या व्यक्तीने स्वतःचा व्हिडिओ चित्रित केलेला होता त्यामध्ये आपली पत्नी आणि तिचा प्रियकर हे सातत्याने आपल्याला धमकावतात. त्यांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत आहोत, असे म्हटलेले आहे.
मयत व्यक्तीच्या भावाने यासंदर्भात पोलिसात तक्रार दिली असून कमल कलवानी ( वय 42 वर्ष) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. त्यांचा मृतदेह रेल्वे फाटकाजवळ सापडलेला होता आणि त्याजवळ पोलिसांना एक मोबाईल देखील सापडला त्यावरून पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटली आणि ही घटना कमल यांच्या कुटुंबियांना कळविण्यात आली. मोबाईल मधील डाटा पोलिसांनी मिळवलेला असून आपल्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधामुळे आपण त्रस्त झालेला आहोत असे देखील कमल यांनी म्हटलेले आहे.
व्हिडिओमध्ये कमल म्हणतात की, माझ्या पत्नीचे अफेअर सुरू असून मी तिला प्रियकरासोबत पकडलं त्यावेळी तिने तू काहीच करू शकत नाही. कायदा महिलांच्या बाजूने आहे असे म्हणत त्यांनी मला धमकावलं. पत्नीचा प्रियकर आणि त्याच्या घरचे देखील मला सतत धमकावत असून आमचे उत्पन्न पन्नास लाख रुपये आहे. पोलीस ठाण्यात पत्नी पैसे देते त्यामुळे पोलिसही आपली बाजू ऐकून घेत नाही तिच्या त्रासाला वैतागून आपण आत्महत्या करत आहोत’, असे देखील म्हटले आहे. पोलिसांनी त्यांची पत्नी आणि तिचा प्रियकर मधू जैन यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे .