पुण्यात एक खळबळजनक असे प्रकरण समोर आले असून जनावरांचे दूध वाढवण्यासाठी बेकायदा पद्धतीने ऑक्सिटोसिन वापरून जनावरांपासून अधिक दूध मिळावे म्हणून त्यांच्या आणि नागरिकांच्या जीविताशी खेळणाऱ्या या औषधाचे उत्पादन करणाऱ्या एका कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला आहे. त्यात 5 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या असून 52 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, कलवड वस्ती येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये या इंजेक्शनचे उत्पादन सुरू होते. अमली पदार्थ विरोधी पथकाचे हवलदार यांना या प्रकरणी माहिती मिळाल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन विभागाला याची माहिती देण्यात आली आणि त्यानंतर संयुक्तपणे अमली पदार्थ विरोधी पथक आणि अन्न आणि औषध प्रशासन विभाग यांनी पत्र्याच्या शेडवर छापा टाकला त्या वेळी तब्बल 55 लाख रुपयांची बेकायदा पद्धतीने साठवलेली औषधे जप्त करण्यात आली.
ऑक्सिटोसिन हे कृत्रिमरित्या शरीरातील हार्मोन्स वाढवते . त्याचा वापर हा प्रसूतीदरम्यान महिलांना इंजेक्शन देण्यासाठी करण्यात येतो मात्र गेल्या काही वर्षात याचा वापर केल्यानंतर जनावरांकडून जास्त दूध मिळते अशी अफवा पसरली आणि त्यानंतर बेकायदा पद्धतीने याचा व्यवसाय सुरू झाला. इंजेक्शन देऊन जनावरांचे दूध काढलेले दूध हे पिल्यानंतर नागरिकांना देखील अनेक आजारांचा सामना करावा लागतो. त्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, ऐकण्यास कमी येणे, दिसण्यास कमी होणे तसेच पोटाचे आजार होण्याची देखील शक्यता आहे तसेच जनावरांच्या जीविताला देखील मोठ्या प्रमाणात या औषधामुळे धोका निर्माण होतो. पथकाकडून केलेल्या कारवाईचे पुणेकरांकडून जोरदार स्वागत केले जात आहे.