‘ तुला चार पाच गर्लफ्रेंड निदान माझी तरी सोड ‘ , पोलीस पोहचले तेव्हा चक्क..

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना उघडकीला आलेली असून प्रेमप्रकरणातून एका हॉटेल चालकाची त्याच्या मित्राने अत्यंत अमानुषपणे हत्या केलेली आहे. भिवंडी येथील हे प्रकरण असून महात्मा नगर परिसरात हा प्रकार घडलेला असून अवघ्या बारा तासांच्या पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत असलम अंसारी असे आरोपीचे नाव असल्याचे समजते.

उपलब्ध माहितीनुसार, महात्मा नगर परिसरात सलमान खान ( वय 21 ) नावाचा व्यक्ती हॉटेल व्यवसाय करतो तर आरोपी असलम अंसारी हा त्याच परिसरात रहायला असून ते दोघे जिवलग मित्र आहेत. सलमानला चार ते पाच मैत्रिणी होत्या त्यातील एका मैत्रिणीसोबत असलम याचेदेखील सूत जुळले आणि त्यामुळे असलम हा त्या मैत्रिणीसोबत प्रेम संबंध ठेवण्यासाठी सलमान याला विनंती करत होता त्यामुळे त्यांच्यात वादही झाला त्यावेळी असलम याने सलमानला त्याचे गुप्तांग कापून टाकण्याची धमकी दिली होती.

रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोघे सोबत बसलेले असताना त्याच मैत्रिणीवरून त्यांच्यात वाद झाला आणि रात्री एक ते दीडच्या सुमारास हॉटेल बंद केल्यानंतर असलम याने सलमान याच्या शरीरावर तब्बल नऊ ठिकाणी वार करून त्याची हत्या केली आणि त्यानंतर तो फरार झाला. सोमवारी सकाळी शांतीनगर पोलिसांना याची माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिस घटनास्थळी पोहोचले त्यावेळी खरोखरच सलमानचे गुप्तांग कापून टाकण्यात आलेले होते आणि ते त्याच्या तोंडात कोंबण्यात आले होते. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकलेल्या असून अवघ्या काही तासांच्या आत आरोपी जेरबंद केल्याने पोलिसांचे परिसरात कौतुक केले जात आहे .


Spread the love