सोशल मीडियावर सध्या एक वेगळेच प्रकरण चर्चेत आलेले असून आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे एका नराधम बापाने पोटच्या मुलीची हत्या केलेली आहे आणि त्यानंतर स्वतःचा एक सेल्फी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केलेला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे
उपलब्ध माहितीनुसार, वारा प्रसाद असे आरोपीचे नाव असून तो एका रुग्णवाहिकेच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करतो. त्याच्या 19 वर्षीय मुलीचे एका मुलासोबत प्रेमसंबंध होते हे लक्षात आल्यानंतर त्याने मुलीला त्या संदर्भात विचारणा केली अनेकदा तिला त्याला भेटू नकोस असे देखील विनंती केली मात्र मुलगी ऐकत नसल्याने अखेर त्याने तिची हत्या केली आणि तिची हत्या का केली या संदर्भातील एक सेल्फी व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करून दिला.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये त्याने सांगितले की, ‘ मी लहानपणापासून माझ्या मुलीला अत्यंत चांगल्या परिस्थितीत सांभाळले आहे अनेकदा मी तिला बॉयफ्रेंडला भेटायला जाऊ नको असे देखील सांगितले होते मात्र तिने आपले काहीच ऐकून घेतले नाही. ती सातत्याने त्या मुलाला भेटत होती त्यामुळे आपला संताप अनावर झाला आणि आपण तिची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .