यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे ? , पुन्हा राज्यात घमासान

Spread the love

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. समीर वानखेडे यांच्यावर आरोप करणारे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला असून याआधी नवाब मलिक यांनी वानखेडे हे मुस्लीम असल्याचा दावा केला होता मात्र आता नवाब मालिकांनी नवीन फोटो समोर आणला असून फोटोवरून आता समीर वानखेडे हे खरंच मुस्लीम आहेत का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे अर्थात ते मुस्लिम असण्यावर कुणाचा आक्षेप दिसत नाही मात्र त्यांनी आपल्या धर्म लपवण्यावरून राज्यात घमासान सुरु आहे.

नवाब मलिक यांनी समोर आणलेल्या या फोटोत समीर वानखेडे मुस्लीम वेशात दिसून येत आहेत. कबूल, कबूल, कबूल असं म्हणत मलिक यांनी हा फोटो ट्विट केला आहे. वानखेडे यांनी वारंवार आपला धर्म मुस्लीम नसल्याचा दावा केला आहे. त्यावर नवाब मलिक यांनी त्यांच्या शाळेचे दाखले देखील समोर आणले आहेत, ज्यामध्ये काही ठिकाणी त्यांचं नाव समीर ज्ञानदेव वानखेडे धर्म हिंदू, तर काही ठिकाणी समीर दाऊद वानखेडे धर्म मुस्लीम असं दिसून येतं आहे. त्यानंतर आता हा फोटो समोर आला आहे.

मंत्री नवाब मलिक हे नुकतेच परदेशात गेले असून त्यांनी स्वतः त्यांच्या या आंतरराष्ट्रीय प्रवासाची माहिती दिली होती. “मी केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व आवश्यक परवानग्या घेऊन दुबईला जात आहे. मी 24 नोव्हेंबर 2021 रोजी भारतात परत येईन. सर्व सरकारी यंत्रणांनी माझ्यावर लक्ष ठेवावे आणि माझ्या हालचालींचा मागोवा घ्यावा ही विनंती ” असं म्हणत आपल्याला वेगळ्या प्रकरणात अडकवू नये यासाठी काळजी घेतलेली दिसते आहे.

जो फोटो मलिक यांनी ट्विट केलाय, त्यामध्ये समीर वानखेडे लग्नातील खुर्चीवर बसल्याचे दिसत आहेत तर त्यांच्या बाजूला बसलेले एक मुस्लीम गृहस्थ हातातील कागदपत्रांवर त्यांच्या सही घेताना दिसता आहेत. त्यामुळे आता वानखेडे यांच्या अडचणी वाढणार असून वानखडे बॅकफूटवर गेलेले असून त्यांच्या बाजूने त्यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर या त्यांची बाजू मांडताना दिसत आहेत.


Spread the love