मनपा अधिकाऱ्याच्या ‘ हनी ट्रॅप ‘ मध्ये वेगळाच अँगल आला समोर

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना नागपूरमध्ये समोर आलेली असून महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र बुचके यांनी एक महिला आपल्याला हनी ट्रॅप करत असल्या प्रकरणी तक्रार दाखल केली होती मात्र या प्रकरणात आता वेगळाच ट्विस्ट आलेला असून बुचके यांनी स्वतः या महिलेला अश्लील व्हिडिओ आणि छायाचित्र पाठवत तिच्यासोबत अश्लील भाषेत चॅटींग देखील केले होते असेही समोर आले आहे. छत्तीसगडच्या राजनांदगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सदर तरुणी ही नागपूर येथील रहिवासी असून छत्तीसगड मधील एका व्यक्तीशी तिची सोशल मीडियावर ओळख झाली होती त्यानंतर त्यांचे प्रेमप्रकरण सुरू झाले आणि 2021 मध्ये अखेर त्यांनी लग्न देखील केले मात्र या तरुणीची राजेंद्र बुचके यांच्यासोबत आधीपासून ओळख होती आणि आणि ते एकमेकांच्या संपर्कात देखील होते मात्र जून दोन हजार बावीस पासून राजेंद्र रुचके यांनी आपल्या सोबत अश्लील चॅट करण्यास सुरुवात केली तसेच आपल्याला स्वतःचे अश्लील व्हिडिओ अन ऑडिओ देखील पाठवले असे देखील या महिलेचे म्हणणे आहे .

महिलेने पुढे म्हटले आहे की राजेंद्र बुचके यांनी आपल्याला शारीरिक संबंध बनवण्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आपण सरकारी अधिकारी आहोत आपले कुणी काही करू शकत नाही असे देखील ते म्हणाले. त्यामुळे आपल्याला प्रचंड मनस्ताप झालेला असून आत्महत्येचे विचार आपल्या डोक्यात येत आहेत असे म्हटलेले आहे. राजनांदगाव पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार देण्यात आली असून कलम 506 ब 509 ब आणि आयटी ऍक्ट 67 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तरुणीचे वकील यांनी राज्यपाल आणि राज्य शासनाला यासंदर्भात पत्र टाकून राजेंद्र बुचके यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे.


Spread the love