नगर जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना शिर्डीत समोर आली असून एका मुलीचे लग्न जमल्यानंतर ती तिच्या होणाऱ्या पतीसोबत साईबाबांच्या दर्शनाला आली होती मात्र होणाऱ्या पतीला गुंगारा देत ती अचानकपणे गायब झालेली आहे. आपल्या मुलीला कुणीतरी फूस लावून पळवून नेले आहे असे या मुलीच्या आईने म्हटले असून शिर्डी पोलिसात यासंदर्भात तक्रार देण्यात आलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सदर मुलगी ही अल्पवयीन असून वय पूर्ण झाल्यानंतर तिचा नात्यात लग्न जुळलेल्या तरुणासोबत विवाह होणार होता . 11 नोव्हेंबर रोजी सदर मुलगी आणि तिचा होणारा पती हे श्रीरामपूर येथून शिर्डीला दर्शनासाठी गेलेले होते . संध्याकाळपर्यंत ते घरी आले नाहीत म्हणून आम्ही चिंतेत असताना अचानक तिच्या होणाऱ्या पतीचा फोन आम्हाला आला आणि त्याने जी माहिती दिली ती धक्कादायक होती.
मुलीसोबत मंदिरात गेलेल्या या तरुणाने सांगितले आहे की, आम्ही मंदिराच्या गेट नंबर 4 समोरील पार्किंगमध्ये गाडी लावली होती त्यानंतर आम्ही साईबाबांचे दर्शन घेतली मंदिर परिसरात फिरलो आणि घरी जायचे म्हणून मी तिला चार नंबर गेटच्या समोर थांब असे सांगत मोटरसायकल आणायला गेलो मात्र मोटारसायकल घेऊन आलो त्यावेळी ती तिथे आढळून आली नाही. तरुणाचा फोन आल्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी देखील शिर्डीत धाव घेतली मात्र ती आढळून आली नाही . आपल्या मुलीला कोणीतरी फूस लावून पळवून नेले आहे असे मुलीच्या आईचे म्हणणे आहे.