महाराष्ट्रात ट्रिपल तलाकचे एक वेगळेच प्रकरण समोर आले असून माहेरहून पैसे आणण्यासाठी शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन पत्नीला तलाक तलाक तलाक असे तीन वेळा म्हणत तिचे टक्कल केल्याप्रकरणी आरोपी पतीसोबत तीन जणांविरोधात शहरातील जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सुमय्या कलीम चौधरी ( राहणार उत्तर सोलापूर ) असे फिर्यादी महिलेचे नाव असून त्यांचा विवाह कलीम चौधरी याच्यासोबत मे 2022 मध्ये झालेला होता . लग्नानंतर काही दिवसात पतीने आपण सध्या भाड्याच्या घरात राहत आहोत. आपल्याला नवीन घर घ्यायचे आहे त्यामुळे तू लवकरात लवकर पाच लाख रुपये घेऊन ये असे म्हणत तिला त्रास देण्यास सुरू केले. किरकोळ कारणावरून त्याने तिच्यासोबत भांडण सुरू केले आणि त्यानंतर एका खोलीत कोंडून तिला उपाशी देखील ठेवले.
काही दिवसानंतर त्याने एका नाभिकाला बोलावून तिच्या डोक्यावरचे केस कापून काढले आणि पाच लाख रुपये तर तुला नांदवेल असे देखील धमकी दिली त्यावेळी तलाक तलाक तलाक असे तीन वेळा म्हणत त्याने पत्नीकडून देखील कोऱ्या कागदावर सही घेतली असे फिर्यादी यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी तिचा पती कलीम चौधरी, सासू सासरा यांच्याविरोधात मुस्लिम महिला संरक्षण कलम तीन आणि चार अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.