म्हणून भगतसिंग कोशारी बेताल वक्तव्ये करत आहेत , माजी मुख्यमंत्री म्हणतात की..

Spread the love

‘ राज्यपाल भगतसिंग कोशारी हे जाणीवपूर्वक बेताल वक्तव्य करत आहेत त्यांना हिमाचल प्रदेशला पुन्हा जायचे आहे आणि राजकारणात सक्रिय व्हायचे आहे मात्र मोदी त्यांना जाऊ देत नाहीत म्हणून मुद्दाम अशी काहीतरी वक्तव्य ते करत आहेत अशा राज्यपालांना कोपरापासुन हात जोडले पाहिजे ‘, असा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लावलेला असून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न बाबत बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 14 दिवस तुरुंगवास भोगलेला आहे त्यामुळे ते महाराष्ट्राचे हित जपतील अशीही आशा व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत 2004 मध्ये महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयात दाखल केलेला दावा सध्या प्रलंबित असून त्या दाव्यावर कर्नाटक सरकारने 2014 साली प्रतिवादी दावा दाखल केलेला आहे. दावा ताकतीने लढवण्यासाठी न्यायालयात सरकारने वकिलांची फौज तयार केलेली आहे त्यामुळे कर्नाटक सरकार किंवा मुख्यमंत्री हे काय म्हणतात याला काही अर्थ नाही.

राहुल गांधी यांनी सुरू केलेली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात न भूतो न भविष्यती अशी झालेली आहे. देशाच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात निघालेली ही एकमेव यात्रा असावी. जगात फार कमी स्वरूपात अशा स्वरूपाच्या यात्रा निघालेल्या आहेत त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण झालेली आहे, असेही ते पुढे म्हणाले .


Spread the love