आश्रमशाळेतील संचालकाने दाखवला अश्लील व्हिडीओ, आरोपीस बेड्या

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना नाशिक जिल्ह्यातील म्हसरूळ शिवारात उघडकीला आलेली असून 14 वर्षांच्या शाळकरी मुलीवर आधार आश्रमाच्या संचालकाने बलात्कार केल्याचे प्रकरण उघडकीला आलेले आहे आहे. सदर प्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून त्याने इतरही मुलींसोबत असाच प्रकार केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, हर्षल बाळकृष्ण मोरे ( राहणार सटाणा ) असे आरोपीचे नाव असून द किंग फाउंडेशन या संस्थेकडून चालवल्या जाणाऱ्या ज्ञानदीप गुरुकुल आधाराश्रम येथे हा प्रकार घडलेला आहे. आश्रमात अल्पवयीन मुलीवर आरोपीने अत्याचार केलेला असून पीडित मुलगी ही एका आदिवासी तालुक्यातील रहिवासी आहे.

मुलीच्या म्हणण्याप्रमाणे हर्षल याने तिचा हात पकडून बळजबरीने तिला पार्किंगमधील पत्र्याच्या खोलीत नेले आणि तिथे त्यावेळी त्यानेअश्लील व्हिडिओ तिला दाखवला आणि बळजबरी देखील केली. तिने विरोध केला असता तिला हॉस्टेलमधून काढून टाकण्याची देखील त्याने धमकी दिली.13 ऑक्टोबर रोजी हा प्रकार घडला असल्याचे देखील मुलीचे म्हणणे आहे. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


Spread the love