सख्ख्या मावशीची नियत फिरली, तरुणीच्या पोटात दुखू लागले अन ..

Spread the love

एक खळबळजनक अशी घटना नगर जिल्ह्यात राहता तालुक्यात उघडकीला आली असून नात्याने सख्खी मावशी असलेल्या एका महिलेने आणि तिच्या मैत्रिणीने आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या एका 20 वर्षीय युवतीला तिच्या इच्छेविरुद्ध अनेक ग्राहकाशी शरीरसंबंध करण्यास भाग पाडले आणि तिला वेश्याव्यवसायात ढकलले. राहता पोलिसांनी दोन महिला आणि अन्य पाच पुरुष यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून चार जणांना बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, पीडित तरुणी ही औरंगाबाद जिल्ह्यातील असून तिच्या आई-वडिलांचे निधन झालेले आहे. त्यानंतर ती मध्य प्रदेश येथे सावत्र आईकडे राहण्यास गेलेली होती मात्र तिला सावत्र आई त्रास देत असल्याने तिच्या मामाने तिला मावशीकडे आणून ठेवले. तिची मावशी येथे एका हॉटेलमध्ये कामाला असून एक ऑक्टोबरला संध्याकाळी सहाच्या सुमारास मावशीने तिला मैत्रिणीसोबत शिर्डी येथे नेले होते त्यावेळी तिने या तरुणीला हॉटेलमध्ये एका व्यक्तीसोबत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले.

धक्कादायक बाब म्हणजे सदर प्रकरणातील अत्याचार करणारा आरोपी याचे वय 55 वर्ष असून तो मूळचा शेंडी येथील रहिवासी आहे त्यानंतर चार-पाच दिवसांनी पुन्हा व्यवसायाने वकील असलेल्या व्यक्तीने देखील तिच्यावर अत्याचार केला आणि दीड महिन्यात सुमारे पाच ते सहा व्यक्तीनी आपल्यावर अत्याचार केले असे पीडितेचे म्हणणे आहे. सदर हॉटेलमधील मॅनेजर हा या मुलीपर्यंत ग्राहक आणून देण्याचे काम करायचा आणि त्याने देखील या तरुणीवर अत्याचार केले.

23 नोव्हेंबर रोजी पीडित तरुणीच्या पोटात दुखू लागले म्हणून तिला दवाखान्यात नेले असता सदर मुलगी ही माझी भाची आहे आणि तिला अनाथाश्रमात दाखल करायचे आहे असे सांगत महिलेने पोलिसांकडे दाखला मागितला त्यावेळी पोलिस स्टेशनमध्ये अधिकाऱ्यांना संशय आल्यानंतर त्यांनी सर्व माहिती विचारली त्यावेळी हा धक्कादायक प्रकार उघडकीला आला. पोलिसांनी पीडित तरुणीची मावशी, तिची मैत्रीण , गोरख राधाकिसन पाडेकर, भूषण पवार तिचा मावसभाऊ यांच्यासह इतरही दोन आरोपींवर विरोध विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले असून पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.


Spread the love