व्यवसायात नुकसान झाले कि लोक अनेक कारणे पुढे करतात. कधी पार्टनरवर लोटून देतात तर कधी व्यवसायच खराब आहे असे सांगून आत्मपरीक्षण करणे सोयीकररीत्या टाळतात. मात्र मुंबईजवळ वसई इथे तर एका व्यापाऱ्याने चक्क हद्दच केली आहे .मुलीच्या लग्नासाठी जमा केलेले 10 लाख रुपये बिटकॉईनमध्ये अडकवले मात्र त्यात तोटा झाल्यामुळे बायकोला आता काय उत्तर द्यायचे, या विचारातून विरारच्या एका व्यापाराने चक्क दहा लाख रुपयांच्या लुटीचाच बनाव रचला मात्र पोलीस तपासात त्याचे पितळ उघडे पडले मात्र पोलिसांनी देखील त्याला समज देऊन सोडून दिले आहे .
वसईच्या पापडी येथील साई सर्व्हिस सेंटरसमोर 10 लाख रुपयांची रोकड घेऊन अज्ञात चोरटा फरार झाला असल्याची तक्रार विरारच्या सुभंत यशवंत लिंगायत यांनी काल दुपारी एक वाजताच्या सुमारास वसई पोलिस ठाण्यात केली होती. जबरी चोरीची घटना असल्याने पोलीस यंत्रणा कामाला लागली. पोलीस घटनास्थळी पोहचल्यावर त्यांना पूर्ण प्रकरणच बनावट असल्याचे लक्षात आले .
22 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 च्या सुमारास वसईच्या साई सर्व्हिस येथे रिक्षा थांबवून रस्ता क्रॉस करणार तेवढ्यात एका अज्ञात बाईकस्वाराने हातातील दहा लाखाची रोकड हिसकावली आणि तो फरार झाला. ही रक्कम बोरीवली येथे काही व्यापाऱ्यांना द्यायची होती, असा बनाव व्यापाऱ्याने आखला होता. मात्र पोलिसांना घटनास्थळावर कोणतीही अशी घटना घडल्यासंदर्भातचे पुरावे आढळले नाही.
8 डिसेंबर रोजी सुभंत लिंगायत यांच्या मुलीचं लग्न ठरलं होत आणि या लग्नासाठी म्हणून त्यांनी १० लाख रुपये जमवले होते मात्र अधिक पैसे मिळवण्याच्या आशेने त्यांनी ते बिटकॉईनमध्ये अडकवले आणि त्यात त्यांना तोटा झाला. घरी बायकोला काय सांगायचे याच विचाराने त्याने आपली दहा लाखाची रोखड चोरटयाने चोरुन नेल्याचा बनाव आखण्याची त्याने युक्ती आखली असल्याचे शेवटी पोलीस तपासात कबुली दिल्याने सर्व प्रकाराचा उलगडा झाला आहे.