‘ त्या ‘ राजकीय पदाधिकाऱ्याची पोलीस कोठडीत रवानगी, महिला म्हणतेय माझ्या..

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण औरंगाबाद येथे समोर आले असून एका विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार तिच्यावर अत्याचार करण्यात आले त्यानंतर ती गर्भवती झाल्यावर तिच्या पोटावर लाथा मारून तिचा गर्भ देखील पाडण्यात आला . मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात आरोपीच्या विरोधात बलात्कारासह इतर कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पाच दिवसांची पोलिस कोठडी आरोपीला सुनावण्यात आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार जयकिशन उदकराम कांबळे ( वय 31 ) असे आरोपीचे नाव असून तो एका राजकीय पक्षाशी संबंधित आहे. पीडित महिलेसोबत ओळख झाल्यानंतर त्याने तिच्या पतीला देखील धमकावत मला तिच्यासोबत लग्न करायचे आहे मी तिच्याशिवाय राहू शकत नाही. जर तू तिला सोडले नाहीस तर तुला कायमचे संपवेल असे म्हणून त्याला धमकी दिली होती त्यानंतर पतीने पीडित महिलेला सोडून दिले त्यामुळे ती आईच्या घरी राहू लागली.

आईच्या घरी राहत असताना आरोपी तिथे अनेक वेळा जायचा त्या वेळी त्याने पीडित लग्नाचे आमिष दाखवले आणि त्यानंतर तिच्यावर वारंवार अत्याचार केले. लग्नसंदर्भात विचारणा केल्यानंतर तो टाळाटाळ करू लागला तसेच तिच्या चारित्र्यावर देखील संशय घेऊ लागला दरम्यानच्या काळात ती गर्भवती झालेली होती तरी देखील त्याने तिच्या कमरेवर लाथ मारली त्यामुळे तिचा गर्भपात झाला. काही कालावधीत त्याने तिच्याकडे जाणे मी देखील बंद केले आणि तिचा फोन देखील उचलणे बंद केले.

27 नोव्हेंबर रोजी त्याने पीडित महिलेला व्हाट्सअप वर व्हिडिओ कॉल करून शिवीगाळ करत एक महिला आपल्यासोबत आहे असे दाखवत तिला शिवीगाळ देखील केली त्यानंतर त्याची पक्षाच्या पदावरून हकालपट्टी देखील करण्यात आली आणि पक्षातून पाच वर्षांसाठी निलंबित देखील करण्यात आले. आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आलेला असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे.


Spread the love