नांदेड हादरले..बायकोच्या वाढदिवशी पतीचे लक्ष ‘ भलतीकडेच ‘ मात्र त्यानंतर

Spread the love

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना नांदेड येथे उघडकीस आली आहे. पत्नीच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीत डान्स करणाऱ्या इतर मुलींचे छायाचित्र काढण्यास पत्नीने पतीला विरोध केला त्यामुळे पतीचा संताप अनावर झाला आणि पतीने पत्नीला मारहाण करत चक्क ब्लेडने तिचा गळा कापला तसेच मध्ये येणाऱ्या सासूला देखील मारहाण केली. पत्नी आणि सासू या दोघेही जखमी झाल्या असून रूग्णालयात उपचार घेत आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, शिल्पा सैनी या महिलेचा वाढदिवस होता त्यानिमित्त तिचा पती गुरुपाल सिंह सैनी याने घरीच पार्टीचे आयोजन केले होते.फिल्मी गाणे लावून डान्स रंगात आला असताना गुरु पाल सिंह याने नाचणाऱ्या मुलींचे फोटो काढण्यास सुरुवात केली त्यामुळे पत्नीने त्याला विरोध केला.

पती गुरु पाल सिंह याने त्यानंतर स्प्रे मारायला सुरू केले त्यामुळे पत्नीने त्या प्रकारास देखील विरोध केला. यामुळे गुरु पाल सिंह याचा संताप अनावर झाला आणि आणि त्याने शिल्पाच्या डोक्यात बुक्क्याने प्रहार केला तर दुसऱ्या हाताने ब्लेडने शिल्पा यांचा गळा चिरला. त्यानंतर सासुमध्ये आली असता गुरु पाल सिंह याने सासूला देखील मारहाण केली, त्यामुळे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे


Spread the love