पुणे इथे एक संतापजनक आणि हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आलेली असून एका मुलीच्या आईने चक्क तिचे ज्या व्यक्ती सोबत प्रेमसंबंध आहेत त्याच व्यक्तीसोबत लग्न करण्यास भाग पाडले आहे. सदर मुलीला याआधी हा व्यक्ती म्हणजे तुझे वडील आहेत असे देखील तिने सांगितले होते.
उपलब्ध माहितीनुसार, सदर कुटुंबीय हे वडगाव शेरी येथील रहिवासी असून पीडित मुलीच्या आईचे एका 28 वर्षीय व्यक्ती सोबत प्रेमसंबंध आहे तर मुलीच्या आईचे वय छत्तीस वर्ष आहे. मुलीला आईने आतापर्यंत हेच तुझे खरे वडील आहेत असे सांगितले होते मात्र काही दिवस गेल्यानंतर आईने त्या मुलींना याच व्यक्तीसोबत लग्न करण्यास भाग पाडले. तू त्याच्यासोबत लग्न केले नाही तर मी जिव देईन असे देखील या आईने सांगत मुलीला त्या व्यक्तीसोबत शरीरसंबंध ठेवण्यास देखील भाग पाडले.
गेली अनेक महिन्यांपासून पीडित मुलगी ही हा त्रास सहन करत होती मात्र तिने तिच्या शाळेतील एका मित्राला या प्रकरणी माहिती दिली आणि या प्रकरणाला वाचा फुटली. पोलिसांनी सध्या 36 वर्षीय महिला आणि तिचा 28 वर्षे प्रियकर यांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याविरोधात बालविवाह प्रतिबंधक कायदा तसेच प्रियकराच्या विरोधात सोबतच 376 अंतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला असून या घटनेनंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.