एका नामांकित व्यावसायिकाला हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवून त्याला तब्बल 80 लाखांचा गंडा घालणाऱ्या एका प्रसिद्ध यूट्यूबरला दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून नामरा कादिर असे या तरुणीचे नाव आहे. नामरा कादिर हिच्या विरोधात सदर व्यावसायिकाने पोलिसात तक्रार दाखल केली होती त्यानंतर पोलिसांनी या तरुणीला बेड्या ठोकल्या आणि तिची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात केली तर तिचा पती विराट बेनीवाल याचा पोलीस शोध घेत आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, नामरा कादिर ही एक युट्यूबर तरुणी असून सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय आहे. तिच्या चॅनेलवर तिला तब्बल सहा लाखांच्या पुढे सबस्क्रायबर असून इंटरनेटवरती सोशल मीडिया आयकॉन म्हणून ओळखली जाते. तिच्याविरोधात 24 नोव्हेंबरला एका गुरुग्राम येथील व्यावसायिकाने ती आपल्याला हनी ट्रॅप करण्याची धमकी देत असून आत्तापर्यंत तिने 80 लाख रुपये आपले उकळलेले आहेत अशी तक्रार दिली होती सोबतच तिचा पती देखील यात सहभागी आहे असे देखील त्याने सांगितले होते.
तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार कामाच्या निमित्ताने मी नामरा कादिर नावाच्या मुलीला रेडिसन हॉटेल येथे भेटलो होतो. तिचे अनेक व्हिडिओ मी पाहिलेले असून तिने तिचा पती असलेला तसेच युट्युबवर असलेला विराट बेनीवाल याच्यासोबत आपला मित्र अशी आपली ओळख करून दिली होती. दोघांनी माझ्या कंपनीसाठी काम करण्यास होकार दिला आणि त्यानंतर दोन लाख रुपये आपल्याला मागितले.
नामरा हिला आपण ओळखत असल्याने आपण त्याच दिवशी तिला दोन लाख रुपये देऊन टाकले त्यानंतर मी जाहिरात घेऊन आलो तेव्हा त्यांनी पुन्हा आणखी पन्नास हजार रुपये मागितले ते देखील आपण दिले मात्र त्यांनी आपले काम केले नाही. नामरा हीने तुम्ही मला आवडत आहात मला तुमच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे. माझ्या बहिणीचे लग्न झाल्यानंतर मी तुमचे पैसे देऊन टाकेल असे देखील तिने सांगितले त्यावेळी आमची मैत्री झाली आणि तिच्या पतीसोबत आम्ही तिघेही ठीकठिकाणी फिरू लागलो.
एके दिवशी नामरा कादिर आणि तिचा मित्र यांनी दोघांनी मिळून मला जबरदस्तीने दारू पाजली आणि एटीएम कार्ड मागितले. विरोध केला तर तुमच्या विरोधात बलात्काराची तक्रार करू असे देखील तिने सांगितले. त्यावेळी विराट हा तिचा पती असल्याचे सांगितल्यानंतर आपल्याला धक्काच बसला आणि त्यांनी पोलीस केसमध्ये अडकवण्याची धमकी देत आपल्याकडून आत्तापर्यंत तब्बल 80 लाख रुपये घेतले असे या व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
आपल्याकडून पैसे घेतल्यानंतर नामरा कादिर हिने मोबाईल फोन रिसेट करत सर्व पुरावे नष्ट करून टाकले मात्र त्यानंतरही सातत्याने आपल्याला ते पैसे मागत असल्याने अखेर वडिलांच्या खात्यातून देखील पाच लाख रुपये त्यांनी मला काढण्यास भाग पाडले. सातत्याने त्यांच्याकडून पैशासाठी अशा स्वरूपाने त्रास होत असल्याने आपण अखेर पोलिसात येण्याचा निर्णय घेतलेला आहे असे व्यावसायिकाने सांगितले. पोलिसांनी त्यानंतर व्यावसायिकाच्या बँक खात्याची तपासणी केली त्यावेळी त्याने नामरा कादिर हिला पैसे दिल्याचे समोर आले असून तिला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत तिचा पती फरार झालेला आहे.