एक खळबळजनक अशी घटना अमरावती येथे समोर आलेली असून इंस्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर एका तरुणीला आपली विवस्त्र अवस्थेतील छायाचित्रे पाठवणे एका इंजिनीअरिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीला चांगलेच महागात पडले आहे. सदर तरुणाने तिची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडे शरीर संबंध ठेवण्यासाठी तगादा लावलेला होता. पीडित तरुणीने अखेर सायबर पोलिस ठाणे गाठून आरोपीच्या विरोधात तक्रार दिली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, रोहन पाटील ( राहणार बल्लारशा जिल्हा चंद्रपूर ) असे आरोपीचे नाव असून त्याचे एक इंस्टाग्राम अकाउंट आहे. सदर तरुणी सोबत त्याची इंस्टाग्रामवर ओळख झाली होती त्यानंतर त्यांनी एकमेकांशी आपले फोन नंबर शेअर केले आणि तासनतास बोलू लागले. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर आरोपी तरुणाने तिला इंस्टाग्रामवर विवस्त्र अवस्थेतील फोटो सोशल मीडियावर पाठवण्यास सांगितले आणि तरुणीने मागचा पुढचा विचार न करता त्याने सांगितले त्या पद्धतीने स्वतःचे फोटो पाठवून दिले.
फोटो मिळाल्यानंतर काही दिवसात आरोपी तरुणाने तिला भेटण्यासाठी गळ घातली आणि त्यावेळी त्याने तिच्याकडे शरीरसंबंधाची मागणी केली मात्र तिने त्याला नकार दिला त्यावेळी त्याने दोघांमधील संवाद आणि तिची खासगी छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी दिली . तरुणीने त्यानंतर मात्र हे प्रकरण घरी सांगितले त्याच्याविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी कारवाई करत त्याचे इंस्टाग्राम अकाउंट ब्लॉक केलेले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मार्गदर्शन सीमा दाताळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असल्याचे समजते.