ब्रेकअप झाल्याचे त्याचे स्टेटस पाहून तरुणीला धक्का , पुण्यातील घटना

Spread the love

ब्रेकअप

पुण्यात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून एका तरुणाने प्रेयसीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर चक्क व्हाट्सअप स्टेटसला या तरुणीचे न्यूड फोटो स्टेटस ठेवले आहे. त्यानंतर सदर तरुणी आणि तरुण यांच्यात वाद झाले आणि पीडित तरुणीने अखेर पोलिस स्टेशन गाठले असून आरोपीच्या विरोधात तक्रार दिलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, देवेंद्र धरमचंद फुलपगार असे आरोपीचे नाव असून त्याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. काही काळ सोबत राहिल्यानंतर त्यांच्यात ब्रेकअप झाले आणि त्यानंतर प्रेयसीने त्याचे फोन उचलणे बंद केले. तो राग मनात धरून त्याने ज्यावेळी प्रेमप्रकरण सुरू होते त्यावेळी या तरुणीचे काढलेले नग्न फोटो चक्क स्वतःच्या व्हाट्सअप स्टेटसला ठेवले. तरुणीने हे पाहिल्यानंतर तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.


Spread the love