देशात एक खळबळजनक घटना दिल्ली येथे समोर आली असून अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने खून केलेला आहे . खून करण्याआधी पत्नीने आणि प्रियकराने मिळून पतीला भरपूर दारू पाजली मात्र त्यानंतर मारहाण केल्यावरही त्याचा जीव जात नसल्याने घरातील पडदा आणि ओढणीने त्याचा गळा आवळण्यात आला. पश्चिम दिल्ली येथील मंडावली भागात हा प्रकार समोर आलेला आहे. पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केलेले आहे
उपलब्ध माहितीनुसार, 4 डिसेंबर रोजी रेल्वे कॉलनी परिसरात राहणारा सुरेश नावाचा व्यक्ती अस्वस्थ झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी पत्नीचा जबाब घेण्यासाठी प्रयत्न केले मात्र आपण सध्या खूप दुःखात आहोत काय बोलावे हेच सुचत नाही, असं सांगून पत्नीने पोलिसांची दिशाभूल केली. सुरेशचे नातेवाईक सुरेशच्या घरी आले मात्र त्याचा खून असल्याची शंका कुणालाच आली नाही.
सात डिसेंबर रोजी पोस्टमार्टेम झाल्यावर पोलिसांनी सुरेश याचा मृतदेह त्याची पत्नी आणि भाऊ यांच्याकडे सोपवला त्यावेळी सुरेशच्या शरीरावर काही जखमा असल्याचे दिसून आले. सुरेशचा भाऊ याने या संदर्भात पोलिसांना हिंट दिली त्यानंतर पोलिसांनी पत्नी मुले व कुटुंबातील इतर सदस्य यांची देखील माहिती घेतली मात्र काहीही समोर आले नाही.
शंका म्हणून पोलिसांनी सुरेशच्या पत्नीला चौकशीसाठी बोलावले त्यावेळी तिच्या बोलण्यात तफावत आढळून आल्याने हा खुनाचा प्रकार असल्याचा पोलिसांचा देखील संशय बळावला आणि त्यांनी सुरेश याच्या पत्नीची माहिती काढण्यास सुरुवात केली त्यावेळी तिचे सचिन नावाच्या एका व्यक्ती सोबत प्रेम संबंध असल्याचे समोर आले. पोलिसांनी सुरेशची पत्नी हेमा आणि तिचा प्रियकर असलेला सचिन यांना ताब्यात घेतले त्यावेळी त्यांनी संबंध असल्याचे कबूल केले मात्र त्याचा आमच्या अनैतिक संबंधास अडथळा होत होता म्हणून त्याचा खून केला, असे सांगितले आहे.