राजकारण महिला आल्या की त्यांना नामोहरम करण्यासाठी विरोधकांचे सोपे हत्यार बहुतांश वेळा महिलांचे चारित्र्य हेच असते मात्र अनेक वेळा याही पुढे जात धक्कादायक प्रकार केले जातात. असाच एक प्रकार पाकिस्तान इथे उघडकीस आला असून पाकिस्तानमध्ये महिला आमदाराचा कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल करून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सानिया आशिक असे या महिला आमदाराचे नाव असून सानियाच्या तक्रारीनंतर ही अटक करण्यात आली आहे. सानिया आशिक पाकिस्तान मुस्लिम लीग नवाजच्या सदस्या असून पंजाब प्रांतातील तक्षशिला विधानसभा मतदारसंघाच्या प्रांतीय सदस्य आहेत. सदर आक्षेपार्ह व्हिडिओबद्दल सानिया आशिक यांनी 26 ऑक्टोबर रोजी सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणेकडे तक्रार केली होती.
तक्रारीनंतर पंजाब प्रांतातील पोलीस आणि एफआयएने तपास सुरू केला. तीन आठवड्यांच्या तपासानंतर एफआयएने लाहोरमधून एका व्यक्तीला अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी अद्यापही या व्यक्तीची ओळख उघड केली नाही. व्हिडीओमध्ये दिसणारी महिला सानिया आशिक आहे की अन्य कोणी आहे हे देखील सांगण्यात आले नाही. या व्यक्तीच्या अटकेची केवळ जुजबी माहिती माध्यमांना देण्यात आलेली आहे.
सानियाने तिच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “त्यानं (अज्ञात) माझा व्हिडिओ टिकटॉकवर व्हायरल करण्यासोबतच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फोटो पोस्ट केले आहेत. व्हिडिओतील महिला माझ्यासारखी दिसते आहे. त्यानंतर शेकडो धमकीचे कॉल, टिकटॉकवर अश्लील गाणी, फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट, माझ्याशी संबंधित यादृच्छिक क्लिप म्हणजे माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न आहे.