प्रेमप्रकरणातील काही ऑडिओ इतके गमतीशीर असतात की त्याची चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. असाच दोन मैत्रिणींमध्ये संभाषणाचा एक ऑडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून त्यामध्ये समोरील तरुणीने आपली जवळची मैत्रीण समजून आपले गाऱ्हाणे सांगितले मात्र मात्र या मैत्रिणीने तिच्याशी दगाबाजी करत हा ऑडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि तो जोरदार व्हायरल झाला.
व्हायरल झालेल्या ऑडिओमध्ये तिची मैत्रीण ही गोड गोड बोलून तिच्याकडून सर्व माहिती काढून घेते आणि त्यानंतर तिने हा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. पीडित मुलीने तिला आपल्या ब्रेकअपची बातमी सांगितली आणि आपले ब्रेकअप का झालेले आहे, कसे झाले आपण किती दुःखी आहोत या संदर्भात आपल्या जीवाभावाच्या मैत्रिणीला सांगितले मात्र मैत्रिणीने ते जगजाहीर केले. सदर मैत्रिणीने फोन स्पीकरवर ठेवून त्याचा ऑडिओ काढलेला आहे त्यातील संभाषण देखील ऐकण्यासारखे आहे.
probably the funniest post-breakup crying session 😭😭 pic.twitter.com/tkac4bbgxs
— isHaHaHa (@hajarkagalwa) December 8, 2022
सदर संभाषणात मुलगी सांगते की दोन महिने त्याच्यासोबत आपले रिलेशनशिप होते मात्र ते पुढे जाऊ शकत नाही म्हणून ही मुलगी रडत आहे. त्यावेळी तिची मैत्रीण तिला ‘ असे कसे झाले ‘ असे विचारत असताना समोरील मुलगी सांगते की, ‘ आमच्या रिलेशनशिपच्या दोन महिन्यांच्या एनिवर्सरीसाठी मी थ्रेडिंग वॅक्सीन करून घेतले. मला इतका त्रास झाला की ब्युटीपार्लरमध्ये देखील मी आरडाओरडा केला मात्र त्याचा एटीट्यूड बघ तो म्हणतोय मला खात्री नाही. मला वाटते की आपण ब्रेक घेतला पाहिजे ‘. सदर ऑडिओ हा तिच्या मैत्रिणीने रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला.