महाराष्ट्रात एक वेगळीच घटना नगर जिल्ह्यात समोर आलेली असून आपला नवरा काहीच कामधंदा करत नाही. त्याला बाहेरचा देखील नाद आहे असे सांगत एका भोंदूबाबाने दिलेली पावडर महिलेने आपल्या नवऱ्याला पंधरा दिवस भाजीत टाकून खायला दिली मात्र त्यानंतर काहीही फरक न झाल्याने अखेर महिलेने कर्जत पोलीस ठाणे भोंदूबाबाच्या विरोधात तक्रार दिलेली आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, नवनाथ साहेबराव मांडगे ( राहणार जळकेवाडी तालुका कर्जत ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव असून पीडित महिलेची मुलगी ही पुण्यात राहते. मात्र तिचा पती काहीच कामधंदा कळत नसल्याने शेजारी राहणाऱ्या एका महिलेने या भोंदूबाबाची ओळख करून दिली होती. त्यानंतर या बाबाने महिलेला आणि तिच्या मुलीला समोर बसवून तुझा नवरा मी दिलेल्या औषधानंतर कामधंदा शोधु लागेल आणि त्याचा बाहेरचा नाद देखील कमी होईल असे सांगत पांढरी पावडरची पुडी खाऊ घालण्यासाठी तिला दिली होती त्यानंतर त्याने घरात ताईत दिले आणि याबद्दल पंधरा हजार रुपये उकळले.
काही दिवसांनी हा भोंदूबाबा पुन्हा पीडित महिलेला भेटला त्यावेळी त्याने आधी ते पंधरा हजार रुपये राहिलेले आहे ते द्या असे सांगितले अन काही फरक पडला का ? असे विचारले त्यावेळी या पीडित महिलेने तुम्ही दिलेली सगळी पावडर मुलीने नवऱ्याला खाऊ घातली मात्र त्याच्या वर्तनात काहीही बदल झालेला नाही असे सांगितले. त्यानंतर देखील या भोंदू बाबाचा पैशासाठी तगादा सुरू होता म्हणून अखेर महिलेने कर्जत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या कानावर ही बाब घातली आणि त्यानंतर भोंदूबाबांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.