देशात एक खळबळजनक अशी घटना कर्नाटक इथे समोर आली असून बागलकोट परिसरात एका तरुणाने त्याच्या वडिलांचा खून करून त्यांचे तब्बल 30 तुकडे करून बोअरवेल मध्ये फेकून दिले. आरोपीचे नाव विठ्ठल असे असून तो अवघा वीस वर्षांचा आहे.
उपलब्ध माहितीनुसार, विठ्ठल याच्या पित्याचे नाव परशुराम असे असून आपले वडील कायम दारू पीत होते आणि आपल्याला मारहाण करायचे त्यामुळे आपण अखेर त्यांचे तीस तुकडे केले तसेच हे कुणाला कळू नये म्हणून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे आपण ३०० फूट खोल बोअरवेलमध्ये टाकून दिले असे म्हटलेले आहे. सहा डिसेंबर रोजी ही घटना समोर आली असून घटना घडल्यानंतर आरोपी पसार झाला होता.
तो घरी आल्यानंतर घरच्यांनी त्याला वडिलांबद्दल माहिती विचारली त्यावेळी त्याने काहीही माहिती दिली नाही मात्र त्याच्या वागण्यावरून संशय आल्याने प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकलेल्या असून आपले वडील आपल्याला दारू पिऊन त्रास देत होते म्हणून आपण हा प्रकार केला असे सांगितले आहे.