महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण समोर आले असून पुणे येथील ही घटना आहे. कामानिमित्त पती बाहेर गेल्यानंतर तो त्याच्या पत्नीला फोनवर चक्क विवस्त्र अवस्थेत फोटो पाठवण्याची जबरदस्ती तिला करत होता त्यानंतर त्याने तिच्यासोबत अनेकदा अनैसर्गिक कृत्य करून तिला यातना दिल्या. अखेर त्याच्या या प्रकाराला पत्नी माहेरी आली आणि शाहूपुरी पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार दिलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सदर विवाहित महिला ही 24 वर्षांची असून तिच्या पतीसमवेत पुणे येथे राहते. कामानिमित्त पती बाहेर गेल्यानंतर तिला फोन करून तो तिच्या विवस्त्र फोटोची मागणी तिला करत होता त्याला अनेकदा पत्नीने नकार दिला मात्र त्याने तिचे ऐकून घेतले नाही आणि तिला वेगवेगळ्या स्वरूपाच्या धमक्या देखील दिल्या अन अखेर ही पत्नी त्याला तसे फोटो पाठवू लागली. मूड बनवायचा आहे असे सांगून तो तिला असे फोटो मागत असायचा.
काही काळ उलटल्यानंतर पतीने तिला रोज फोन करून विवस्त्र अवस्थेत झोपण्यास सांगितले आणि त्यानंतर जर कधी तो आला तर त्याने तिच्यासोबत वारंवार अनैसर्गिक पद्धतीने कृत्य करून तिला त्रास दिला. सासू-सासरे यांनी देखील आपल्याला छळले आहे असे पीडित महिलेचे म्हणणे असून त्याच्या या विकृत मानसिकतेला कंटाळून सदर महिला ही माहेरी सातारा येथे राहण्यास आली. माहेरच्या मंडळींशी चर्चा केल्यानंतर तिने अखेर पोलीस ठाण्यात धाव घेतली.