महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना नाशिक येथे उघडकीला आली असून अवघ्या काही महिन्यांपूर्वी विवाह झालेला असताना नवदाम्पत्य असलेल्या दोघांनी नैराश्यातून तसेच आर्थिक अडचण आणि फसवणूक झाल्याने राहत्या घरात आत्महत्या केलेली आहे. पाथर्डी फाटा येथे ही घटना घडली असून गौरव जितेंद्र जगताप ( वय 29 ) आणि त्याची पत्नी नेहा अशी मयत दाम्पत्याची नावे आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, सदर प्रकार हा पाथर्डी फाटा परिसरातील नयनतारा गोल्ड नावाच्या अपार्टमेंटमध्ये घडलेला असून नेहा तिच्या पतीसोबत या फ्लॅटमध्ये वास्तव्याला होती. गौरव हा एका कंपनीत काम करत होता मात्र काही दिवसांपासून त्याची नोकरी सुटलेली होती. दोन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता मात्र नोकरी हाती नसल्याने जितेंद्र हा गौरव हा नैराश्यात गेलेला होता.
रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास या दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यापूर्वी गौरव याला त्याची मावशी चित्रा यांनी फोन केला होता मात्र त्याने फोन उचलला नाही त्यानंतर मावशीने या प्रकाराची कल्पना गौरवच्या भावाला दिली आणि भाऊ गौरवच्या घरी आल्यानंतर दरवाजा ठोठावला मात्र आतून प्रतिसाद आला नाही म्हणून इंदिरानगर पोलिसांना याप्रकरणी खबर देण्यात आली आणि पोलिसांनी दरवाजा उघडला त्यावेळी त्यांनी आत्महत्या केलेली होती.
सुसाईड नोटमध्ये त्यांनी युनूस मणियार हा सतत फोन करून धमकी देत असल्याने तसेच मयूर बैरागी याने आपलॆ साडेसहा लाखांना फसवणूक केल्यामुळे आपण आत्महत्या करत आहोत असे म्हटलेले आहे .