पुण्यात हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट ? कल्याणी देशपांडे ताब्यात अन..

Spread the love

कल्याणी देशपांडे

पुण्यात एक खळबळजनक घटना काही वर्षांपूर्वी चर्चेत आली होती .हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवत संघटित गुन्हेगारी करणारी कल्याणी देशपांडे हिच्यासोबत आणखी एका व्यक्तीला विशेष न्यायाधीश एस आर नावंदर यांनी सात वर्ष सक्तमजुरी आणि दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड भरला नाही ही तर आणखी एक वर्ष कारावास भोगावा लागेल असे आदेशात म्हटले आहे.

पुण्यातील उच्चभ्रू असलेल्या कोथरूड परिसरात एका सोसायटीमध्ये कल्याणी देशपांडे हिला हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट प्रकरणी ऑक्टोबर 2016 मध्ये अटक करण्यात आली होती. पुणे शहरात संघटितपणे वेश्याव्यवसाय केल्याप्रकरणी तिच्यावर संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत खटला चालवण्यात आला. कल्याणी देशपांडे हिच्यावर कोथरूड विश्रांतवाडी हिंजवडी परिसरात आतापर्यंत 20 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहे.

1998 सालापासून या क्षेत्रात ती कार्यरत असून अनेक गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींसोबत तिचे व्यावसायिक संबंध आहेत. तिच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती त्यानंतर पोलिसांनी तिची कुंडली काढण्यास सुरुवात केली त्या वेळी एक एक प्रकरण बाहेर येऊ लागले आणि तिला बेड्या ठोकण्यात आल्या. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी न्यायालयासमोर तिच्या विरोधातील पुराव्यांची यादीच सादर केली आणि त्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला.


Spread the love