महाराष्ट्रात एक वेगळेच प्रकरण सध्या समोर आले असून मुंबईतील गोराई परिसरातील एका लग्नात बळजबरीने घुसून एकवीस हजार रुपये तृतीयपंथी व्यक्तीने मागितले होते. कोणतेही निमंत्रण नसताना हे तीन तृतीयपंथीय लग्नात दाखल झाले आणि त्यांनी तिथे चांगलाच गोंधळ घातला. प्रकरण पोलिसात गेल्याचे समजताच तिन्ही जणांनी तिथे तेथून पलायन केले मात्र आम्ही पुन्हा येताना हत्यार घेऊन येऊ असे देखील ते म्हणाले.
तक्रारदार हे बोरिवली परिसरातील रहिवासी असून शुक्रवारी हा प्रकार घडलेला आहे. शुक्रवारी सकाळी लग्न असल्याने तक्रारदार हे लग्न सोहळ्याच्या तयारीत असताना हे तीन जण तिथे आले त्यावेळी नवरदेव आणि कुटुंबियांना त्यांनी आशीर्वाद दिले आणि सोबतच पैशाची मागणी केली. तक्रारदार यांनी त्यांना एक हजार रुपयांचे पाकीट आणि साडीचोळी दिली मात्र 21 हजार रुपयांच्या आत आम्ही एक रुपयाही घेणार नाही असे सांगत त्यांनी आणखी पैसे मागण्यास सुरवात केली अखेर तक्रारदार यांनी त्यांना अकरा हजार रुपये दिले मात्र तरीही त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
लग्न घरात येऊन तृतीयपंथी असलेल्या व्यक्तीनी त्यांचे कपडे पाडत पायजम्याची नाडी देखील सोडली आणि विवस्त्र होत नवरदेव आणि त्याच्या घरच्यांना शिव्याशाप देण्यास सुरुवात केली. लग्नसमारंभात काही काळ यामुळे चांगलाच गोंधळ निर्माण झाला मात्र पोलिसांचा उल्लेख होताच या तीनही जणांनी रिक्षातून पळ काढला आणि आम्ही आता पुन्हा येऊ त्या वेळेस हत्यारे घेऊन येऊ असे देखील ते म्हणाले.