गुजरात मॉडेल..उपचारासाठी आलेल्या मायलेकी कुजलेल्या अवस्थेत

Spread the love

ज्या गुजरात मॉडेलची देशभरात चर्चा केली जाते त्याच गुजरातमधून एक खळबळजनक अशी घटना समोर आली असून अहमदाबाद येथे एका रुग्णालयात आई आणि मुलीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आलेला आहे. ऑपरेशन थेटरमध्ये एका कपाटात मुलीचा मृतदेह तर आईचा मृतदेह खाटेखाली सापडलेला आहे.

कागडपीठ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या भुलाबाई पार्क येथील एका हॉस्पिटलमधून दुर्गंधी येत होती त्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी कपाट उघडले त्यावेळी त्या कपाटात तीस वर्षीय महिलेचा मृतदेह ठेवण्यात आला होता. पोलिसांनी त्यानंतर घटनास्थळी दाखल झाल्यावर अधिक तपास केला त्यावेळी पलंगाखाली आणखी एका महिलेचा अर्थात पहिल्या मयत महिलेच्या आईचा मृत्यू आढळून आला.

सदर मुलगी आणि तिची आई या रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र अचानकपणे त्या गायब झाल्या. रुग्णालयातून त्या दोघी निघून गेल्या असाव्यात असा हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचा समज झाला मात्र त्या घरी पोहचल्या नाहीत आणि त्यानंतर तपास सुरू असतानाच हा धक्कादायक प्रकार समोर आला असून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.

कागडपीठ पोलिसांनी भारती वाला (३०) आणि तिची आई चंपा अशी मृतांची ओळख पटवली असून दोघींना आधी गुंगीचे औषध पाजले गेले आणि नंतर त्त्यांचा गळा दाबला गेला. पोलिसांनी रुग्णालयातील कंपाउंडर मनसुख याला ताब्यात घेतले असून तो भारतीच्या सासरच्या मंडळींशी संबंधित असल्याचे पोलिसांनी सांगितले.


Spread the love