पुणे हादरलं..मुझे माफ करो बुबू खुदा ने बुलाया है

Spread the love

कोरोना संकटानंतर नागरिकांचे अर्थचक्र पूर्णपणे बिघडले असून अनेक कुटुंबांची गाडी अद्यापही रुळावर आली नाही. आर्थिक अडचणीमुळे आणखीन एक आत्महत्या बारामती तालुक्यात माळेगाव येथे उघडकीला आलेली असून पीरदर्गा परिसरात राहणाऱ्या मोहम्मद हसन शेख ( वय 35 ) या व्यक्तीने घरी वायरने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सदर घटना ही 23 डिसेंबर रोजी पहाटे घडली असून सावकारीतून ही घटना घडल्याचे दिसून येत आहे. महंमद शेख हे पेंटर काम करत होते. त्यांना पाच मुली आणि पत्नी असा परिवार असून गेल्या काही वर्षांपासून कुटुंब आर्थिक संकटात सापडलेले होते. पोलिसांनी धाव घेतली अन त्यानंतर मृतदेह खाली उतरवण्यात आला. त्यांच्या खिशात आढळून आलेल्या सुसाईड नोटमध्ये ‘ मेरे पास बहुत जनो का पैसा आहे तो मुझे डर लागता है..मुझे माफ करो बुबू मुझे खुदा ने बुलाया है ‘ असा मजकूर आढळून आला.

महंमद शेख यांच्याकडे कुणाचे पैसे होते आणि त्यांना कोण पैशासाठी त्रास देत होते का ? याचा पोलिस शोध घेत असून तपासाअंती दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी दिलेली आहे. पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आलेली असून बी जी जगताप हे प्रकरणाचा तपास करत आहेत.


Spread the love