नाती शर्मसार..पोलीस पोहचले तेव्हा मामीसोबत ‘ असा ‘ व्यक्ती की

Spread the love

सोशल मीडियावर सध्या एका आगळ्यावेगळ्या प्रेमप्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून सदर प्रकरणात एक मामी तिच्या भाच्याच्या प्रेमात पडली आणि त्यानंतर त्याच्यासोबत पळून गेली. स्वतःचा सोन्यासारखा संसार मोडला आणि त्यानंतर ती भाच्यासोबत दुसऱ्या गावी बायको म्हणून राहत असल्याचे प्रकरण समोर आले. उत्तर प्रदेश येथील ही घटना आहे.

उपलब्ध माहितीनुसार संबंधित मामी हिचा गडिया गावातील एका तरुणासोबत विवाह झालेला होता. लग्न झाल्यावर मामाला दोन मुले देखील झाली मात्र याच वेळी मामाचा भाचा हा घरी येत असायचा आणि त्याचे त्याच्या मामीसोबत प्रेमसंबंध जुळले आणि त्यानंतर ही मामी भाच्याला घेऊन फरार झाली. एकीकडे तिचा पती आणि मुले तिला शोधत होती तर ती दुसरीकडे भाच्यासोबत संसार थाटून ती बायको म्हणून राहत होती.

भाच्याची आई हिला देखील आपल्या मुलाच्या या प्रकाराची जाणीव नव्हती म्हणून तिने पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली त्यावेळी पोलिसांना सुरुवातीला फक्त तरुणाची माहिती तो मध्य प्रदेशात राहत असल्याची मिळाली मात्र प्रत्यक्षात जेव्हा पोलीस तेथे पोहोचले त्यावेळी हा तरुण त्याच्या मामीसोबत संसार थाटून दोघे पती-पत्नीसारखे राहत होते.

पोलिसांनी तात्काळ दोघांना पकडून उत्तर प्रदेशातील इथे नेले असून दोन्ही परिवारांना बोलावून घेत समजूत काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केलेला आहे मात्र भाचा आणि मामी दोघेही वयस्क असल्याने पोलिसांच्या देखील कारवाईला मर्यादा येत आहेत. पोलीस चौकशीत मामीने म्हटले की ‘ मला माझा नवरा आवडत नव्हता म्हणून मी माझ्या भाच्याच्या प्रेमात पडले आणि त्यानंतर मला त्याच्यासोबतच संसार करायचा आहे’.


Spread the love