मुंबईतली पॉर्नस्टार ब्लॅकमेल करतेय , शेवटचा व्हिडीओ बनवून अखेर..

Spread the love

सोशल मीडियावर एक खळबळजनक असा व्हिडिओ व्हायरल झालेला असून त्यामध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांनी चक्क कॅमेऱ्याच्या समोर घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. तीनही जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करून करण्यात आले असून तिन्ही व्यक्तींची प्रकृती गंभीर आहे. उज्जैन येथील हे प्रकरण असून मुंबईच्या एका पॉर्नस्टार असलेल्या तरुणीने आपल्याला ब्लॅकमेल केले असे या व्हिडिओमध्ये पीडित कुटुंबीय म्हणत आहे.

उपलब्ध माहितीनुसार, अशी खान असे पिडीत व्यक्तीचे नाव असून मुंबईतील एका तरुणीने आपल्याला ब्लॅकमेल केले त्यामुळे आपण वैतागून विष प्राशन करत आहोत असे व्हिडिओमधील व्यक्ती म्हणते. माझे नाव अशी खान असून उज्जैन येथील लोहेपूल येथील मी रहिवासी आहे. व्हिडिओमधील इतर व्यक्ती माझी आई आणि पत्नी आहे. मुंबईतील रिमझिम दास नावाची एक पॉर्नस्टार पैशासाठी आपल्याला सतत ब्लॅकमेल करत आहे. मी तिचे पैसे दिले नाही तर ती आत्महत्या देखील करेल असे तिने सांगितले आहे. माझ्या लग्नाच्या वेळी मी तिला पैसे दिले आता ती आणखीन पैशाचा आग्रह धरत आहे, ‘ असे देखील हा व्यक्ती व्हिडिओ सांगत आहे.

व्हिडिओमध्ये व्यक्ती म्हणतो की, ‘ मी एकदा मुंबईत असताना तिने मला बलात्काराच्या प्रकरणात अडकवले आणि तुरुंगामध्ये पाठवलं. उज्जैन येथील तुरुंगामध्ये देखील तिने मला पाठवण्यात यश मिळवले आहे आणि आता ती आत्महत्या करणार असल्याचे सांगत आणखीन पैसे मागत आहे. ते मी देऊ शकत नाही म्हणून एक कुटुंब म्हणून आम्ही आता विष प्राशन करत आहोत. ‘

अशी खान हे मुंबई येथे कापड व्यापारी म्हणून काम करतात त्यावेळी त्यांची रिमझिम दास नावाच्या या तरुणीसोबत ओळख झालेली होती. त्यानंतर तिने त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि त्यांच्याकडून पैसे हडप करण्यास सुरुवात केली. पैसे दिले नाही म्हणून याआधी दोनदा तुरुंगात देखील तिने त्यांना पाठवले असे देखील अशी खान व्हिडिओमध्ये म्हणतात.


Spread the love