महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना जळगाव जिल्ह्यात समोर आली असून अतिप्रसंग करण्यास विरोध करणाऱ्या विवाहितेला चक्क अज्ञात व्यक्तीने पेटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे 23 नोव्हेंबर रोजी हा प्रकार घडलेला असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे . पोलिसांनी कारवाई करत एका 50 वर्षीय व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून वर्णनावरून तपास सुरु आहे .
उपलब्ध माहितीनुसार, 23 तारखेला दुपारी तीनच्या सुमारास वडगाव शहरातील ओम शांती केंद्राच्या मागे एका 50 वर्षीय अनोळखी व्यक्तीने 47 वर्षीय महिलेचा हात पकडुन तिच्या सोबत अश्लिल कृत्य करण्याचा प्रकार केला मात्र महिलेने त्याला विरोध केला म्हणून त्याने चक्क तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केला.
घाबरून गेलेल्या महिलेने तात्काळ पोलीस ठाणे गाठत संशयिताचे वर्णन पोलिसांना सांगितले आणि त्यानुसार पोलिसांनी चॉकलेटी तपकिरी रंगाचा शर्ट, हिरव्या रंगाची पॅंट असलेल्या व्यक्ती व्यक्तीचे रेखाचित्र बनवत त्याचा शोध सुरु केला आहे . पीडित महिलेला दवाखान्यात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती आहे.