पुणे हादरलं..प्रेयसीच्या पतीला संगमवाडीत गाठले अन..

Spread the love

पुण्यात एक खळबळजनक अशी घटना समोर आली असून बायकोशी प्रेमसंबंधातून वाद झाल्यानंतर प्रियकराने महिलेच्या पतीच्या डोक्यावर कोयत्याने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. संगमवाडी परिसरातील एका 32 वर्षीय पतीने या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, कानिफनाथ कोलार असे आरोपी व्यक्तीचे नाव असून त्याचे तक्रारदार यांच्या पत्नीसोबत गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. सदर प्रकरण उघडकीला आल्यानंतर पतीने पत्नीला समजावून सांगितले आणि त्यानंतर कानिफनाथ याला देखील वेळोवेळी समजावले होते मात्र तो ऐकून घेण्याच्या मनस्थितीत दिसून आला नाही.

तक्रारदार शनिवारी रात्री रिक्षातून जात असताना कानिफनाथ हा अचानक आडवा आला आणि त्याने तक्रारदार यांना रिक्षातून बाहेर ओढत त्यांच्या डोक्यावर आणि हातावर वार करून गंभीर जखमी केले आणि त्यानंतर तेथून पलायन केले. पोलिसांनी आरोपी कानिफनाथ याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.


Spread the love