पुण्यात सध्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या गॅंग अस्तित्वात असून त्यांच्यातील गॅंगवारने शहरातील शांतता बिघडत चाललेली आहे. पुणे शहरातील नाना पेठ येथे काही दिवसांपूर्वी अक्षय वाल्हाळ नावाच्या तरुणाची कोयत्याने आणि दगड विटांनी मारहाण करून हत्या करण्यात आली होती त्यानंतर त्याचा बदला म्हणून पुण्यातील बुधवार पेठेत पुन्हा एकदा गोळीबार झालेला आहे.
अक्षय याचा खून करणाऱ्या आरोपींच्या भावावर गोळीबार करून कोयत्याने वार करण्यात आले असून बुधवार पेठेतील रामेश्वर चौकात हा प्रकार घडला. शेखर अशोक शिंदे ( वय 32 ) असे जखमी तरुणाचे नाव असून तो सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. शेखर याच्या भावाने काही महिन्यांपूर्वी अक्षय याचा खून केलेला होता त्याचा बदला घेण्यासाठी म्हणून हा प्रकार करण्यात आल्याचे आल्याची चर्चा आहे.
मंगळवारी रात्री शेखर हा रामेश्वर चौकातून दुचाकीवर निघाला होता त्यावेळी पाठीमागून काहीजण दुचाकीवरून आले आणि त्यांनी शेखर याला अडवत तुझ्या भावाने आमचा मित्र अक्षय याचा खून केलेला आहे त्याचा बदला म्हणून आज तुझा मर्डर आम्ही करणार आहोत असे म्हणत तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणून त्याच्या डोक्याला पिस्तूल लावले आणि डोक्यात गोळीबार केला. त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. शेखर रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपींनी तिथून पलायन केले.
सदर प्रकरणाची पोलिसांना खबर मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी अवस्थेत शेखर यास रुग्णालयात दाखल केले . सदर प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. प्राथमिक दृष्ट्या हा प्रकार खुनाचा बदला म्हणून करण्यात आल्याचे दिसून येत असून यात इतरही काही अँगल आहे का ? याचा पोलीस शोध घेत आहेत.