शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या उपनगरात गॅंग सुरू झालेल्या असून पुण्यात भाईगिरी आणि गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत आहे त्यामुळे पुण्याचे नाव खराब होत आहे. असाच एक प्रकार सिंहगड कॉलेज जवळील वडगाव बुद्रुक गावाजवळ उघडकीला आलेला असून कोयता गॅंग मधील एक सदस्य दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता त्याला पोलिसांनी पकडून जोरदार चोप दिलेला आहे
उपलब्ध माहितीनुसार, अक्षय इंगवले आणि धनंजय पाटील अशी या जांबाज पोलिस अधिकाऱ्यांची नावे असून त्यांनी केलेल्या कामगिरीचे सध्या पुणेकरांकडून जोरदार स्वागत केले जात आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या सिंहगड लॉ कॉलेज परिसरात दोन तरुण कोयता हातात घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना अटक केली.
अनेक ठिकाणी या आरोपींनी याआधी देखील दहशत पसरवलेली असून दारू पिऊन कोयते करून नागरिकांच्या अंगावर धावून जात त्यांच्यात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. 28 डिसेंबर रोजी दोन तरुणांनी हातात सुरे आणि चाकू घेऊन दुकानांमध्ये जाऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हापासून पोलिस त्यांच्या मागावर होते. पोलिसांनी चक्क त्यांचा पाठलाग करुन त्यांना बेड्या ठोकल्या आणि जिथे दहशत निर्माण करत होते तिथेच चोप देखील दिला त्याबद्दल पोलिसांचे पुणेकरांकडून जोरदार कौतुक करण्यात येत आहे .