महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना औरंगाबाद येथे उघडकीला आलेली असून एका 27 वर्षीय तरुण इंजिनीयरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले त्यानंतर त्याच्यासोबत शरीरसंबंध ठेवून तोतया पोलीस अधिकारी उभे करून त्याला नग्न करून मारहाण करत त्याचा व्हिडिओ बनवण्यात आला. सदर व्हिडिओच्या आधारे त्याला ब्लॅकमेल देखील करण्यात आले आणि दहा लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून चार जणांना अटक केली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, योगिता असे या तरुणीचे नाव असून तिचे साथीदार संजय पंडित जाधव, नकीब नसीर पटेल, प्रतीक सुधीर जाधव ( सर्वजण राहणार औरंगाबाद ) अशी आरोपींची नावे असून पीडित 27 वर्षीय तरुण हा सोशल मीडियावर सक्रिय असताना आरोपी तरुणीने त्याला आपल्या मादक अदा दाखवत प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते आणि त्यानंतर तिने त्याच्यासोबत शरीर संबंध देखील ठेवले.
आरोपी प्रतिक जाधव आणि संजय जाधव यांनी त्यानंतर या तरुणाला फोन केला आणि तुझे कुरियर आले आहे ते घेऊन जा असे सांगत त्याला एका ठिकाणी बोलावले आणि पांढर्या रंगाच्या बीएमडब्ल्यू गाडीत बसून एका हॉटेलमध्ये घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर आपण मुंबई क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक आहोत अशी धमकी देत योगिता हिने तुमच्या विरोधात कंप्लेंट दाखल केली आहे अशी या तरुणाला भीतीदेखील दाखवण्यात आली त्यामुळे तो घाबरून गेला. तो घाबरून गेलेला आहे हे लक्षात येताच आरोपींनी त्याला अंगावरील कपडे उतरविण्यास सांगितले आणि त्यानंतर त्याचा नग्नावस्थेतील व्हिडिओ बनवला.
सदर प्रकरण मिटून घेण्यासाठी तू आता दहा लाख रुपये देऊन टाक असे देखील त्यांना धमकावण्यात आले. तरुणाने आपल्याकडे इतके पैसे नाही असे सांगितल्यानंतर त्यांनी 40 हजार रुपये त्यांच्या अकाउंटवर घेतले आणि त्याची बुलेट देखील ओढून गेली. बुलेट पाहिजे असतील तर अजून पाच लाख रुपये घेऊन ये असे देखील त्याला धमकावले त्यानंतर या तरुणाने घाबरून जातात सातारा पोलीस ठाणे जाऊन झाला प्रकार कथन केला.
पोलिसांनी याप्रकरणी सापळा रचून चारही आरोपींना अटक केली असून पुन्हा एकदा हनी ट्रॅप प्रकार चांगलाच चर्चेत आलेला आहे. यापूर्वी देखील महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात अशाच स्वरूपाच्या घटना उघडकीला आलेल्या आहेत. सोशल मीडियावर नागरिकांनी सक्रिय असणे हे वाईट नाही मात्र आपण कुणासोबत बोलत आहोत समोरील व्यक्तीला आपण ओळखत आहोत की नाही आणि बोलण्यासाठी देखील कुठपर्यंतच्या मर्यादा आपण पाळत आहोत याचे देखील भान ठेवणे गरजेचे आहे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.