राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर येथे एक खळबळजनक असे प्रकरण समोर आले असून नागपुरात गुन्हेगारी वाढली असल्याचे दिसून येत आहे. ई रिक्षा चालवणाऱ्या एका व्यक्तीच्या पत्नीला प्रेमसंबंधातून पळवून नेण्यात आले होते त्यानंतर त्याच महिलेच्या पतीवर देखील जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून अजनी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सचिन नरेश धनविजय ( वय 41 राहणार रामबाग ) असे तक्रारदार व्यक्तीचे नाव असून सचिन याच्या पहिल्या पत्नीचे आरोपींपैकी एका सोबत प्रेमसंबंध होते त्यातून ती मुलीसोबत घरातील किमती वस्तू घेऊन पळून गेली होती त्यानंतर आरोपी संतोष गौतम निकोसे ( वय 35 सावित्रीबाई फुले नगर ) आणि बॉबी गौतम निकोसे ( वय 32 ) यांच्यासोबत भांडण झाले होते.
सचिन गुरुवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास प्रवासी घेऊन जात असताना आरोपी संतोष आणि बॉबी यांनी त्याला एकाकी गाठले आणि दुचाकीवरून येऊन लाकडी दांडक्याने मारहाण केली. संतोष यास रुग्णालयात दाखल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे .