पुण्यात एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली असून पिंपरी-चिंचवड परिसरातील आपल्या कार्यालयातून बेपत्ता झालेले वकील शिवशंकर शिंदे यांची अखेर हत्या झाल्याचे समोर आले आहे. काळेवाडी परिसरातून ते काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाले होते. त्यांचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत नांदेड येथे आढळून आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, शिवशंकर शिंदे हे पेशाने वकील असून त्यांचे नात्यातील एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. सदर महिलेच्या पतीच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांच्यात आणि शिवशंकर शिंदे यांच्यात वाद निर्माण झाले होते. आपल्या पत्नीला वेळोवेळी सांगून देखील ती ऐकत नसल्याने या पतीने शिवशंकर शिंदे यांनादेखील पतीने समजून सांगितले होते मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. सदर महिलेचा महिलेचा विवाह दहा वर्षांपूर्वी झालेला आहे मात्र तरीदेखील शिवशंकर शिंदे आणि त्यांच्यात प्रेमसंबंध सुरू झाले आणि त्यानंतर शिवशंकर शिंदे हे त्या महिलेच्या पतीला तू एक तर तिला घटस्फोट दे नाहीतर आत्महत्या कर, अशी देखील धमकी देत होते.
आपल्या पत्नीसोबत प्रेमसंबंध ठेवून देखील तिचा प्रियकर आपल्यालाच दमदाटी करत आहे असे लक्षात आल्यानंतर या महिलेच्या पतीने शिवशंकर शिंदे यांना संपवण्याचे ठरवले आणि त्यानंतर 31 डिसेंबर रोजी दुपारी त्यांच्या कार्यालयातून यांचे अपहरण करण्यात आले. त्यांचे हात-पाय आणि तोंड बांधून एका ड्रममध्ये त्यांना बांधून ठेवले आणि ड्रम घेऊन ते नांदेड जिल्ह्याच्या टोकाला आले. त्यानंतर त्यांचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आलेला असून त्यांची हत्या कधी केली हे अद्यापपर्यंत समोर आलेले नाही.
घटना उघडकीला आल्यानंतर नांदेड पोलिसांनी पुणे पोलिसांशी समन्वय साधत मयत व्यक्तीची ओळख पटवली आणि तीन जणांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामध्ये विवाहित महिलेचा पती, पतिचा भाचा आणि गाडीचा चालक यांचा समावेश आहे. वाकड पोलिसात अपहरण प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती . पुणे पोलिस देखील या प्रकरणाचा शोध घेत होते मात्र दरम्यानच्या काळात त्यांचा मृतदेह आढळून आला .