चक्क ड्रेनेज पाईपमधून नोटा पडू लागल्या..बादल्या संपल्या पण : पहा व्हिडीओ

Spread the love

देशात लाचखोरीची अनेक प्रकरणे बाहेर येत असताना असेच एक प्रकरण कर्नाटक इथे उघडकीस आले आहे .लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी कर्नाटक राज्यात ६८ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. त्यावेळी चक्क घराच्या छतावर आणि ड्रेनेज पाईप्समध्ये ठेवलेले ५० लाख रुपयांपेक्षा जास्त नोटांचे बंडल एसीबी अधिकाऱ्यांनी यावेळी जप्त केले तर काही नोटा ह्या चक्क साड्याच्या घड्यामध्ये लपवण्यात आल्या होता. कर्नाटकातील कुलबुर्गी येथील एका पीडब्ल्यूडी विभागाच्या अभियंत्याच्या घरावर छापा टाकला होता त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला आहे .

उपलब्ध माहितीनुसार ,कलबुर्गी येथील कनिष्ठ अभियंता शांता गौरा बिरदार असे या अधिकाऱ्याचे नाव असून त्याच्या निवासस्थानावर छापा टाकला असताना ज्यामध्ये बाथरूमला लागून असलेल्या घराच्या ड्रेनेज पाईपमध्ये १३.५० लाख रुपयांच्या चलनी नोटांचे बंडल सापडले. त्यांच्याकडून घराच्या छतावरून १५ लाखांची रोकडही जप्त करण्यात आली. कनिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्याच्या घरी चक्क ५५ लाखांहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे.

कारवाई दरम्यान पाईपमधून नोटा बाहेर पडू लागल्यावर अधिकाऱ्यांनी पाईपमधून नोटा गोळा करण्यासाठी त्याखाली बादली धरली होती. नोटा इतक्या होत्या की घरातील बादल्या भरल्या पण नोटा संपल्या नाहीत. सदर घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये अधिकारी आणि प्लंबर पाईपचे काही भाग वेगळे करताना दिसत आहेत. या पाईप्समधून पुन्हा नोटा काढण्यात आल्या.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सादर केलेल्या अहवालाच्या आधारे राज्य सरकार कारवाई करेल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले आहे. नुकतेच एका प्रश्नाच्या उत्तरात मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकार कोणत्याही स्वरूपाचा भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, असे सांगितले होते. आमचे सरकार कठोर कारवाई करेल आणि भ्रष्टाचारात दोषी आढळणाऱ्यांना वाचवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे बोम्मई म्हणाले.


Spread the love