प्रेमविवाह करणाऱ्या तरुणीला येरवड्यात गाठले अन..

Spread the love

पुण्यात एक खळबळजनक घटना समोर आली असून आपल्या विभागात राहत असलेल्या एका तरुणीने प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरत परिसरातील काही तरुणांनी या तरुणीला ठार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. येरवड्यातील मच्छी मार्केट येथे 29 तारखेला ही घटना घडली असून पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, जय अँथनी, अनिकेत जगन्नाथ काकडे, गणेश जगताप आणि सोनू अशी आरोपी व्यक्तींची नावे असून याआधी देखील या तरुणांच्या विरोधात पोलिसात गुन्हे दाखल आहेत. एका 20 वर्षीय तरुणीने त्यांच्या विरोधात फिर्याद दिलेली आहे.

फिर्यादी तरुणी आणि आरोपी हे येरवडा परिसरात एकाच विभागात राहत असून काही वर्षांपूर्वी फिर्यादी तरुणीने आळंदी येथे जाऊन एका तरुणासोबत प्रेमविवाह केला होता त्यानंतर आपल्या विभागातील तरुणीने इतरत्र प्रेमविवाह केला म्हणून याचा राग मनात ठेवत गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता आरोपीने या तरुणीला एकत्र गाठले आणि ‘ तू साठ्याच्या पोराचे लग्न का केले ? असे म्हणून तुला आता सोडणार नाही म्हणून तिच्यावर धारदार शस्त्रांनी वार करण्याचा प्रयत्न केला मात्र फिर्यादी तरुणीने त्यांचा वार चुकवला आणि पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली .

आरोपींनी त्यानंतर तिचे केस ओढून तिला मारहाण केली आणि हवेत तलवार फिरवुन आमचे कोणी काही करू शकत नाही असे म्हणत परिसरात देखील दहशत निर्माण केली. पीडित तरुणीने त्यानंतर आपल्या जीविताला धोका असल्याचे सांगत पोलिसात धाव घेतली आणि पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत .


Spread the love