पुण्यात खराडी इथे जावयाला पेट्रोल टाकून पेटवले

Spread the love

पुण्यात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना समोर आली असून पती-पत्नीत वाद झाल्यानंतर सासू-सासर्‍यांनी चक्क जावयाच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. चंदननगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, लखन बाजीराव काळे ( राहणार शिरूर ) असे तक्रारदार व्यक्तीचे नाव असून पोलिसांनी त्याचे सासरे गेंड्या याजिंदर भोसले आणि सासू बासुंदी गेंड्या भोसले, साडू अल्ताफ विजय काळे आणि बायको पेडॅम लखन काळे आणि मेहुणा रंजीत गेंड्या भोसले ( सर्वजण राहणार खराडी ) यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे.

तक्रारदार लखन आणि त्यांची पत्नी यांच्यात कौटुंबिक वाद असून गेल्या काही वर्षांपासून त्यांची पत्नी मुलगा आणि मुलगी हे त्यांच्या सोबत राहत नाहीत. शुक्रवारी संध्याकाळी त्यांचे सासू-सासरे यांनी पत्नीला नांदवत नसल्याने लखन यांच्याकडे संपर्क केला होता त्यानंतर लखन हे चंदन नगर पोलिस ठाणे हद्दीत राहत असलेल्या भोसले यांच्या घरी गेले होते त्यावेळी त्यांना मारहाण करण्यात आली अन पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला . लखन यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठत गुन्हा नोंदवला आहे .


Spread the love