महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात समोर आली असून एका तरुणाने बामणी पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या कावी इथे आत्महत्या केलेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याच्या वडिलांना त्यांचा आजार असल्याने उपचारासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत होता आणि हा खर्च डोईजड होत असल्याने त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, बाळासाहेब भगवान शिंदे ( वय 27 ) असे मयत व्यक्तीचे नाव असून बाळासाहेब याच्या वडिलांना कॅन्सरचा आजार आहे. वेळोवेळी त्यांना दवाखान्यासाठी घेऊन जावे लागायचे आणि दवाखान्यात गेल्यानंतर आर्थिक अडचणीचा हे कुटुंबीय सामना करत होते. बाळासाहेब हे शेतात गेले आणि त्यांनी झाडाला गळफास घेतल्याची घटना शनिवारी उघडकीला आली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केलेला आहे.