लॉजमधून ‘ करेक्ट कार्यक्रम ‘ करून गेलेली तरुणी गोव्यात पण..

Spread the love

सोशल मीडियावर एका व्यक्तीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यानंतर त्याच्यासोबत मैत्री करत लॉजवर आल्यानंतर त्याच्याजवळील रिव्हॉल्वर आणि रोख रक्कम घेऊन पलायन करणाऱ्या एका तरुणीला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सदर तरुणी ही एका तरुणासोबत आढळून आली असून या बंटी बबलीने आत्तापर्यंत किती जणांना फसवले आहे याचा पोलीस शोध घेत आहेत.

मानपाडा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या राहणाऱ्या महेश पाटील नावाच्या एका व्यक्तीची समृद्धी नावाच्या एका महिलेसोबत ओळख झालेली होती त्यानंतर त्यांनी तिला एका हॉटेलमध्ये जेवणासाठी बोलावले होते आणि हॉटेलच्या बंद खोलीत जेवण केल्यानंतर फिर्यादी हे बाथरूममध्ये गेल्यानंतर समृद्धी हिने त्यांच्याकडील परवानाधारक परवाना असलेले रिव्हॉलवर , एक मोबाईल, सोन्याच्या तीन चैन आणि हातातले कडे तसेच घड्याळ असा सुमारे पाच लाख रुपयांचा ऐवज घेऊन पलायन केले होते. विशेष म्हणजे तक्रारदार यांनी घाबरून न जाता या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.

फिर्यादी महिलेने आत्तापर्यंत त्यांना कधीही आपला मोबाईल नंबर दिलेला नव्हता तसेच पत्ता देखील त्यांना माहिती नव्हता त्यामुळे केवळ फेसबुकच्या माध्यमातून या महिलेचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्यानंतर तिची ओळख पटवण्यात आल्यावर ती महिला खार येथील रहिवासी असल्याचे पोलीस तेथे पोहोचले त्यावेळी ती तिथे आढळून आली नाही.

पोलीस तपास सुरू असताना ती एका तरुणासोबत गोवा येथे गेल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी गोव्यातील मापसा येथे जाऊन या महिलेला तिच्या बॉयफ्रेंडसोबत ताब्यात घेतले आहे. दारूत गुंगीचे औषध टाकून त्यानंतर सोन्याचे दागिने मोबाईल असा किमती ऐवज चोरून ती चक्क विमानाने गोव्यात पोहोचलेली होती. तिथे गेल्यानंतर तिचा बॉयफ्रेंड हा या वस्तूंची विक्री करायचा अशीही माहिती समोर आलेली आहे. बदनामीच्या भीतीने आतापर्यंत कुणीही आपली तक्रार दिली नाही असे देखील तिचे म्हणणे असून पोलिसांनी तिच्याकडून सोळा मोबाईल, रिवाल्वर, दोन जिवंत काडतुसे, दोन महागडी घड्याळ तीनशे ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा तब्बल 20 लाख रुपयांचा ऐवज जप्त केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश कुराडे यांनी दिली आहे.


Spread the love