भुंकत असल्याने कुत्र्यासोबत अमानवीय कृत्य , पोस्ट मार्टेममध्ये उघडकीस

Spread the love

क्रूरतेच्या मर्यादा ओलांडणारी एक घटना कोल्हापूर येथे समोर आलेली असून एक कुत्रे सतत भुंकत असल्याने त्याचा त्रास होऊन एका व्यक्तीने चक्क बंदुकीच्या छर्र्याने या कुत्र्याला गोळ्या घातलेल्या आहेत . दुर्दैवाने त्याचा मृत्यू झालेला असून कोल्हापूर इथे बोंद्रे नगर रिंग रोड परिसरात गगनगिरी पार्क येथे 16 तारखेला संध्याकाळी ही घटना घडली आहे. मंगळवार पेठेतील सरकारी दवाखान्यात या कुत्र्याची उत्तरीय तपासणी करण्यात आली त्यावेळी त्याच्या छातीत छर्रे लागल्याचे दिसून आले.

उपलब्ध माहितीनुसार, तक्रारदार राजू सोनबा बोडके ( वय 32 राहणार लक्षतीर्थ वसाहत सासणे कॉलनी कोल्हापूर ) असे तक्रारदार व्यक्तींचे नाव असून त्यांचा गगनगिरी पार्क इथे जनावरांचा गोठा आहे. त्यांच्या गोठ्यावर राखणासाठी म्हणून पाळीव कुत्रा ठेवलेला होता. तो सतत भुंकत असल्याने परिसरातील रहिवासी असलेला विनायक पाटणकर याने त्यांच्या कुत्र्याला छऱ्याच्या बंदुकीतून गोळ्या घातल्या त्यानंतर राजू बोडके यांनी पोलिसांना याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.

गुरुवारी दुपारी मंगळवार पेठेतील शासकीय रुग्णालयात मृत्युमुखी पडलेल्या या कुत्र्याची तपासणी करण्यात आली त्यावेळी त्याच्या छातीत छर्रे लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा अहवाल पोलिसांना मिळाल्यानंतर संशयित असलेला विनायक पाटणकर यांची देखील चौकशी केली जाईल अशी माहिती सहाय्यक फौजदार संजय कांबळे यांनी दिली आहे.


Spread the love